बार्शी – बार्शी शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या समस्या लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने आमदार दिलीप सोपल यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शहरातील २१ प्रभागांमधील विविध ठिकाणी विंधन विहीर सबमर्सिबल पंप तसेच टाकी बसविण्याच्या कामांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये निधीची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
या प्रस्तावामध्ये शहरातील विविध वसाहती, प्लॉट परिसर, सामाजिक व धार्मिक स्थळांच्या परिसरांसह नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय कमी करणे, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश आहे.
प्रस्तावित कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर बार्शी नगरपरिषदेमार्फत आवश्यक कार्यवाही करून ही कामे तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार दिलीप सोपल यांनी सांगितले.
Post Views: 12