बार्शी – बार्शी शहरातील उद्योजक संतोष दगडू घोलप व घोलप बंधू यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल मेजवानी (व्हेज-नॉनव्हेज) या नव्या हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कांदलगाव चौक, कुर्डूवाडी–लातूर बायपास रोड येथे सोलापूर विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते पार पडणार आहे.सोलापूर जिल्हा विधान परिषदेवर आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार राजेंद्र राऊत यांचा घोलप परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचे उद्घाटन होणार आहे. घोलप परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास बार्शी नगरपालिकेचे नगरसेवक विजय (नाना) राऊत, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर (भैय्या) राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्ष सौ.तेजस्विनीताई प्रशांत कथले, बार्शी पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षीताई रोंगे, माजी नगरसेवक प्रशांत (मालक) कथले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, संचालक अजित (दादा) बारंगुळे, माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील,बा.न.पा. पाणी पुरवठा सभापती संतोष (भैय्या) बारंगुळे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, बार्शी प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्य, डिजिटल मिडियाचे पदाधिकारी व सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, बार्शी शहर व परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन घोलप परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 23