.
अक्कलकोट – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे, विश्व फाउंडेशन शिवपुरीचे संस्थापक
डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, हृदयरोग तज्ञ डॉ.शैलेश पाटील, ख्याता उत्तर कर्नाटक जानपद कलाकार ईश्वर हिरेमठ कनकूर या मान्यवरांना यंदाचा जगद्गुरु बसवलिंगरत्न पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती नागणसूर येथील
जगदगुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान तुप्पीन मठाचे कार्यसेवक विद्याधर गुरव सर यांनी दिली.
दरवर्षी श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ, नागणसूर यांच्या वतीने श्री गुरु बसवलिंगेश्वर यांच्या १४ व्या पुण्य स्मरणोत्सवानिमित्त सालाबादा प्रमाणे दिला जाणारा मानाचा श्री जगद्गुरु बसवलिंग रत्न पुरस्कार यंदा वरील मान्यवरांना देण्यात येणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा दि.२३/१०/२६ रोजी नागणसूर येथील
जगद्गुरु बसवलिंगेश्वर महासंस्थान, तुप्पीन मठ येथे संपन्न होईल.
दि.२३-१०-२०२६ रोजी सकाळी महारुद्राभिषेक, घटस्थापना, ध्वजारोहण, श्री जगद्गुरु बसवलिंग रत्न प्रशस्ती प्रदान, सामूहिक विवाह, धर्मसभा, श्री जगद्गुरु बसवलिंगेश्वर भक्तनिवास उद्घाटन समारंभ, २१००० सुहासिनींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम व ११००० जंगमांचा जंगमार्पण सोहळा होणार आहे. तसेच भाविकांसाठी पुरणपोळी व तुपाचे महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
दि. २४-१०-२०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रींच्या भव्य फोटो व वचन साहित्याची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक नागणसूर गावातील प्रमुख रस्त्यावरून रंगोळीच्या उद्घाटनाने निघणार असून यात श्री जगद्गुरु बसवलिंग शिवयोगी यांचे भव्यचित्र आणि धर्मध्वज असणार आहेत.
या कार्यक्रमास श्री बसवलिंग महास्वामीजी ज्ञान योगाश्रम बिदर, श्री.म.नि.प्र.गुरुपादलिंग महास्वामीजी विरक्त मठ पुरवण बळकवाड, श्री.अभिनव पुंडलिक महाराज पुंडलिक नगर गोधन, श्री.म.नि.प्र.अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ शेळगी, श्री.प्र.शंकर शिवाचार्य हिरेमठ नागणसूर, श्री.प्र.म.शि.अभिनव शांतलिंग शिवाचार्य पंचगंगा हिरेमठ आलमेल, श्री.प्र.म.शि. रुद्रपशुपती शिवाचार्य पुरवत हिरेमठ आमसिद्ध, श्री.प्र.म.शि.शेषुल शिवाचार्य हिरेमठ जेऊर, श्री.अभिनव रेणुशरण पठदेवक मेटगी, श्री.गुळवंता महाराज सिद्धेश्वर हाळसंगी, श्री.करनिसिद्ध महाराज करनिसिद्धमठ हेटा व मंगूर, श्री.शिवाभिराम महाराज बु.विष्णू मंदिर ट्रस्ट पंढरपूर, हलक्या स्वामी हिरेमठ शिवपूर नगर, श्री.अमोघ सिद्ध महाराज संजरबा, श्री शिवयोगी स्वामी महाराज हाळचिंचोली, श्री.म.नि.प्र.राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ मंद्रूप, श्री.म.नि.प्र.शिवानंद महास्वामीजी विरक्त मठ करजनी, श्री.म.नि.प्र. विश्वेश्वरलिंग महास्वामीजी विरक्त मठ कडोली, श्री.म.नि.प्र. शांतलिंग महास्वामीजी विरक्त मठ दुधनी, श्री सोमलिंग महाराज अमोघसिद्धेश्वर शिव मठ हिरेकुडी, श्री चनप्पा महास्वामीजी नागरे हिरेमठ तोरणगाव, श्री.म.नि.प्र. अभिनव शिवलिंग महास्वामीजी विरक्त मठ हिप्परगा, श्री.म.प्र.म. प्रशांत महास्वामी विरक्त मठ हत्ती करगतक, श्री.म.नि.प्र. बसवराजेश्वर महाराज विरक्त मठ राईबाग, श्री संगमेश्वर महास्वामीजी मोघे हालसंगी नरेंद्र, श्री परमपूज्य पांडुरंग महाराज पांडुरंग महाराज मठ जेऊर, श्री विश्वनिल महाराज परमनाथ शाळा, श्री संदेश महाराज आश्रम उपलावडी, श्री रेवणसिद्ध महाराज ज्योत, काशिलिंग गुरू महाराज आदींचे दिव्य सान्निध्य लाभेल.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी
म्हणून ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्राणितीताई शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभा बापू देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सरपंचगौडा बी.पाटील, आमदार एम. वाय.पाटील, अमोलराजे भोसले,
श्रीकांत खानापूरे, अध्यक्ष जागृत हनुमान मंदिर ट्रस्ट, निवृत्त जिल्हाधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, विरय्या स्वामी हिरेमठ, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, सोमेश्वर जमशेट्टी, अशपाक बळोरगी कांतू धनशेट्टी, अक्कन बळग, रमेश बाके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक राजशेखर निंबाळे, माजी नगराध्यक्ष महेश हिंडोळे, मल्लीनाथ पाटील, बसलिंगप्पा खेडगी, मलिक जान शेख, महिबुब मुल्ला, बसवराज करूटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Post Views: 6