सोलापूर – वाशिम येथे पार पडलेल्या १४ वर्षाखालील मुलांच्या राज्य शालेय लॉन टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या यशवंतराजे पवार याने अजिंक्यपद पटकाविल्या मुळे त्याची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.
नवी दिल्ली येथे २२ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ रवाना झाला.
यशवंतराजे हा येथील हरीभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी असून
त्याला क्रीडा शिक्षक माणिक साळसकर व मुख्याध्यापक प्रा.प्रकाश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. सुधीर सालगुडे हे त्याचे प्रशिक्षक आहेत.
त्याच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा लॉन संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी तसेच मानद सचिव राजीव देसाई यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Post Views: 9