सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी गोविंद श्री मंगल कार्यालय चौक परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत चार लोखंडी खोके जप्त करण्यात आले तर दोन खोके जागेवरच निष्कासित करण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपअभियंता अविनाश वाघमारे यांच्या नियंत्रणाखाली आणि अतिक्रमण प्रतिबंधक विभागप्रमुख सोपान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता गणेश काकडे यांच्यासह अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही मोहीम राबविली. यावेळी चार लोखंडी खोके जप्त करण्यात आले तर दोन खोके जागेवरच निष्कासित करण्यात आले.
शहरातील नागरिक व व्यावसायिकांनी सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच महापालिकेच्या जागांवर अनधिकृतपणे हातगाड्या, खोके किंवा अन्य साहित्य ठेवून अतिक्रमण करू नये. अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह पादचाऱ्यांची गैरसोय होते. अनधिकृत अतिक्रमण केल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आला.
—
Post Views: 4