सांगोला – नवरात्री उत्सवाचे औचीत्य साधून माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला यांच्या वतीने सुरु असलेल्या अकोला, संगेवाडी, गार्डी, वाढेगाव, कमलापूर व राजुरी या गावामधील बचतगटात मेळावे घेण्यात आले. याप्रसंगी संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी महिलांना बचतीचे महत्व, सासू-सून नातेसंबध, महिलांमधील सुप्त शक्ती, पाण्याची बचत, लघु उद्योग, स्त्रीचे महत्व, नवरात्रीचे महत्व यासंबंधी चर्चात्मक मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे महिलांचे छोटे छोटे खेळ, गाणी घेण्यात आल्या. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांना हे मेळावे फार आवडले असे मनोगतात सांगितले. मेळाव्यामध्ये संस्था अध्यक्षा प्रा.निलिमा कुलकर्णी, कोषाध्यक्षा व बचतगट प्रमुख डॉ.शालिनी कुलकर्णी, सहसचिव डॉ.केतकी देशपांडे, स्नेहा देशपांडे, नीता लाटणे यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याचे नियोजन व यशस्वी करण्यासाठी संपदा दौंडे, मंगल कुलकर्णी व बचत गटातील महिलांचे सहकार्य लाभले.