सोलापूर : सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजीओथेरपीमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणारी गायत्री मस्के हिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा हरियाणातील चौधरी देवीलाल विद्यापीठात १६ ते २० मार्च २०२७ या कालावधीत होणार आहेत.
नाशिकमधील पंचवटी येथील श्री सप्तश्रुंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन योगासन स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेतून गायत्रीची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत गायत्री मस्के हिने रिदमिक योगासन प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गायत्रीने सोलापुरातील स्नेहसाधना योगा क्लासेस येथे सराव करत असून तिला योगप्रशिक्षक रोहन घाडगे व सारिका घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरीबद्दल सुनील मुसळे, सोनल मुसळे, राजकुमार काशीद व सोमनाथ मस्के यांनी तिचे कौतुक केले.