सोलापूर : हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर व सोलापूर मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने व अलायव्हस लाईफ सायन्सेस च्या सहयोगाने कुटुंब वात्सल्य मेळावा व अति जोखमीच्या गरोदर मातांचे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाला . आज 22.10.2026 रोजी तिम्माप्पा बंडा प्रशालाच्या समोर समाज मंदिर, हुडको कॉलिनी,कुमठा नाका ,सोलापूर येथे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास अध्यक्षीय स्थानी मा.डॉ.मंजिरी कुलकर्णी प्रजनन व माता बाल संगोपन अधिकारी, मनपा सोलापूर, या उपस्थिति होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. समन तांबोळी स्त्री रोग तज्ञ, डॉ. मेहजबीन उल हक स्त्री रोग तज्ञ, डॉ. फिरदोस सय्यद, स्त्री रोग तज्ञ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर प्रकल्प समन्वयक जावेद शेख यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल सादर करून आजच्या आयोजित कार्यक्रमा बद्दलची भूमिका विशद केली.
कार्यक्रमच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना
डॉ. फिरदोस सय्यद
गरोदरपणातील काळजी आणि रुटीन चेकअप, आहार बद्दल सविस्तर माहिती दिली.
डॉ. समन तांबोळी
कुटुंब नियोजन चे महत्व व दोन मुलांमधील अंतर, PCOD विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप डॉ. मंजिरी कुलकर्णी मॅडम(प्रजनन व माता बाल संगोपन अधिकारी, मनपा सोलापूर) यांनी हाय रिस्क गरोदर माता व त्यांच्यातील कुटुंबीय व्यक्ती सोबत संवाद साधताना ते असे म्हणाले कि सुनेची गरोदर [अनंत सासूने काळजी घ्यावी व सुनेने सासूची आयुष्यभर काळजी घ्यावी. गरोदर पणात नोंदी केल्या पाहिजे. शासना मार्फत दिलेल्या सोयी चा लाभ घेतला पाहिजे. फॉलिक असिड, कॅल्शियम च्या गोळ्या खाल्ले पाहिजे.संबंधित डॉ कडे वेळोवेळी चेकअप करून घेतले पाहिजे. दिलेल्या माहितीचा अमंलबजावणी केले पाहिजे. गरोदर पण हे बाईचे दुसरे जन्म आहे. याविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्तावना, सर्वांचे आभार प्रकल्प समन्वयक जावेद यांनी मानले . त्यानंतर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. एकूण 135 सदस्य व 60 गरोदर माता उपस्थिती होत्या.
या कार्यक्रमामध्ये मोफत रक्त तपासणी व औषधे गोळ्या देण्यात आले.
ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश इंगळे समाज मंदिर चे संस्थापक , श्री.जकप्पा कांबळे व संपूर्ण प्रकल्पातील सुपरवायझर पल्लवी भातलवंडे, कविता बनसोडे, प्रियांका कांबळे, प्रतिभा रच्चा, वंदना एकबोटे, दिनकर गाडवे , बालाजी जाधव, कविता राठोड, लक्ष्मी दुपारगुडे , म्हाळप्पा गळाकाटे, यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 23