टेंभुर्णी – टेंभुर्णीकर आधीच दुष्काळाने होरपळून गेले आहेत, त्यात एमएसईबीने भरमसाठ आणि अंदाजे बिले देऊन जनतेची लूट करण्याचा धंदा सुरू केला आहे, असा गंभीर आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे.
एमएसईबी प्रशासन लोकांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहे. ज्यांची जुनी मीटर आहेत, त्यांना रीडिंग न घेता अंदाजे दुप्पट बिले दिली जात आहेत. याबाबत जाब विचारायला गेलेल्या सामान्य ग्राहकांना तेथील कर्मचाऱ्यांकडून उलट-सुलट उत्तरे दिली जातात, नीट बोलले जात नाही, अपमानास्पद वागणूक दिली जाते.
एमएसईबीच्या या दडपशाहीमुळे सर्वसामान्य जनता प्रचंड त्रस्त झाली आहे.
इच्छा नसताना स्मार्ट मीटर बसवू नयेत, ज्यांचे जुने मीटर आहेत त्यांना रीडिंगप्रमाणे बिल द्यावे, अंदाजे बिले देऊन लोकांची लूट थांबवावी, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी एक दिवसीय धरणे आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन अभियंता मा. राजेंद्र पाटील साहेब यांना देण्यात आले.
यावेळी मा. आप्पा किर्ते, मा. निलेश खरात, मा. हनुमंत सरवदे, बहुजन मुक्ती पार्टी टेंभुर्णी शहर अध्यक्ष मा. प्रशांत गायकवाड, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा प्रभारी मा. महेंद्र सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा अध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते हजर होते.
Post Views: 13