सोलापूर – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरशालेय योगासन स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या वयोगटात मॉडेल पब्लिक स्कूलच्या सानवी आडके व जान्हवी आडके यांनी आर्टिस्टिक पेयर या प्रकारात प्रथम व रिदमिक पेयर या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला व त्यांची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. सान्वी मुडगी हिने आर्टिस्टिक सिंगल या प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला.
या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रविकिरण आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष ए. डी. जोशी, सचिव अमोल जोशी, श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिवा सायली जोशी, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी व ममता बसवंती यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
Post Views: 16