पंढरपूर – घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पोषाखासह विविध अलंकार परिधान करण्यात आले आहेत. दरवर्षीच्या प्रथा-परंपरेनुसार मातेचा साजशृंगार करण्यात आला असून, अलंकारांनी सजलेले श्री. विठ्ठलाचे व माता रुक्मिणीचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत असल्याचेमाहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्य जोड, हिऱ्याचे कंगनजोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मारवाडी पेठयांच्या मोत्याचा हार, बाजीराव कंठी, शिरपेस लहान, तोडे जोड, तुळशीची माळ, मस्त्य जोड, सोन्याचे पितांबर इ. अलंकार परिधान करण्यात आलेली आहेत.
रुक्मिणी मातेस सोन्याचे मुकुट, खाड्यांची वेणी, चिंचपेटी हिरवी, ठूशी, सोन्यामोत्याचे ताणवाड जोड, चंद्र, सूर्य, मोत्याचा कंठा, बाजीराव गरसोळी, मन्यामोत्याच्या पाटल्या जोड, मोत्याचे मंगळसूत्र, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, पैंजण जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, लक्ष्मीहार, पुतळ्यांची माळ, तारा मंडळ इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
महालक्ष्मी मातेला सोन्याचे गंठण, तोरडी जोड, इमिटेशन नेकलेस, एकदानी, अष्टपैलू मण्याची कंठी, चंद्रहार, जवेची माळ, चांदीची छत्री इत्याधी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री. व्यंकटेशास तांदळया हार, पदकासह लॉकेट, तुळशीची माळ, मोहरांची माळ, मोठी बोरमाळ, कोयरीहार इत्यादी अलंकार प्रथा परंपरेप्रमाणे परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.
Post Views: 14