पिलीव – शेतकऱ्यांना मोफत साखर देणारा एकमेव ओंकार परिवार ओमराजे बोञे पाटील ओंकार साखर कारखाना परिवारातील सर्व साखर कारखान्यातील युनिट एक चांदापुरी येथील साखर कारखान्यातुन प्रथम उत्पादीत झालेल्या साखर पोत्यांचे पुजन संचालक ओमराजे बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंत सुळ होते यावेळी बोलताना बोञे पाटील म्हणाले की चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओंकार परिवाराने ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुकदार ,कर्मचारीवर्ग पाठीशी खंबीर पणे उभा आहे देशातील एकमेव ओंकार परिवार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिपावलीत ऊसाच्या प्रमाणात मोफत साखर देणारा एकमेव ओंकार साखर कारखाना परिवार आहे. जनलमॅनेजर भिमराव वाघमोडे, सर्व खाते प्रमुख,कर्मचारीवर्गांचे त्यांनी अभिनंदन केले या वेळी जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे ऊस उत्पादक शेतकरी नारायण कर्चे, सर्जेराव पिंगळे, नितीन जाधव, केन मॅनेजर शरद देवकर, चीफ इंजीनियर तानाजीराव देवकते ,समाधान गायकवाड, मोहन घोङके, निलेश गुरव ,रमेश आवताडे यासह बहुसंख्य कर्मचारीवर्ग उपस्थित होते आभार रामभाऊ मगर यांनी मानले. फोटो _ चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यात प्रथम उत्पादीत साखर पोत्याचे पुजन करताना मान्यवर.
Post Views: 8