सोलापूर:-“साने गुरुजींनी, बाल मनावर संस्कार करण्याची आदर्श कार्य आयुष्यभर केले.
मुले म्हणजे देवाघरची फुले असे गुरुजी सांगत. त्यांचा वसा चालविण्याचे म्हणजेच बालमनावर उत्तम संस्कार करण्याचे कार्य शिक्षकच करु शकतात” असे विचार डॉ. महेश खरात (अधिष्ठाता,मानव विज्ञान विद्याशाखा,पु.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांनी व्यक्त केले ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी श्यामराव कराळे(माजी अध्यक्ष,आ.भा. साने गुरुजी कथामाला मुंबई) माजी हे होते.अ.भा.साने गुरुजी कामाला, जिल्हा समिती, सोलापूरच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती राज्यस्तरीय साहित्य सेवा पुरस्कार *एकनाथ आव्हाड* यांना तर निर्मला मठपती स्मृती राज्यस्तरीय बालसाहित्य सेवा पुरस्कार *कविता मेहेंदळे* यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नियोजित मान्यवरांसह,कथामाला अध्यक्षा आरती काळे, डॉ.
श्रुतीश्री वडगबाळकर, (अध्यक्षा म.साप.सोलापूर)
राजेंद्र भोसले, (ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर) कार्यवाह डॉ.रामचंद्र धर्मसाले, कार्याध्यक्ष रंगसिद्ध दसाडे,उपाध्यक्ष गुरुनाथ राजमाने, मार्गदर्शक अशोक खानापुरे कोषाध्यक्ष अशोक म्हमाणे, सहकार्यवाह अरुण धुमाळ
यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या कार्यक्रमामाच्या उत्तरार्धात,
अवधूत म्हमाणे लिखित संस्कार तरंग व अशोक खानापुरे लिखित अनमोल नाती या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले तर,”अंबुताई बहिर्जे, पूजा मैत्रे, शिल्पा जोशी, प्रसन्न नाझरे, राजशेखर धरणे, प्रेरणा मठपती, शिल्पा शृंगारपुरे, संगीता रेळेकर, महेजबिन मुल्ला, बाबागोंडा बिराजदार, एकनाथ गुरव, सत्यमामा चव्हाण” यांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले.
Post Views: 13