सोलापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी अनेक भक्तगण आपापल्या पद्धतीने आपली सेवा आणि भक्ती रुजवतात त्यात अनेक कलावंतही स्वतःच अमूल्य असे योगदान या नवरात्रीच्या काळात देत असतात याच नवरात्रीच्या काळात सालाबाद प्रमाणे आपली भक्ती आणि सेवा आई जगदंबेच्या चरणी सोलापुरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार प्रकाश माने हे देत असतात तुळजापुरला चालत जाणाऱ्या भक्तांना फळ वाटप आणि साडी वाटप हे दरवर्षी करण्याचे प्रयोजन मूर्तिकार प्रकाश माने व त्यांचे कुटुंबीय करत असतात यंदाच्या वर्षीही त्यांनी हिरीरीने सहभाग घेत रूपा भवानी मंदिराजवळ या साहित्यांचे वाटप अत्यंत भक्ती भावाने केले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मूर्तिकार प्रकाश माने आणि चित्रपट लेखक दिग्दर्शक अमोल लहांडे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होते अनेक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला.
Post Views: 13