सोलापूर – कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिका व विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सोमवारी सकाळी सैफुल चौक तसेच विजापूर रोड महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,मंडई उद्यान सभापती राजशेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती व सहभागात ही मोहीम पार पडली व परिसर चकचकीत झाला.
स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर चा नारा देत विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक सदस्य विजय शाबादी,माजी अध्यक्ष महेश देवकर,उपाध्यक्ष सौ.उमा देगीनाळ,गिरीश मंद्रूपकर सौ.प्रीती उडाणशिव,महेश घाडगे,संतोष कदम,बिळेनी बिराजदार, सिद्राया होर्तीकर , सुशील महिंद्रकर,प्रसाद संकद,विश्वनाथ आमणे आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने सैफुल चौक अधिक आकर्षक व सुशोभित करण्याची
मागणी केली व या अनुषंगाने उपमहापौर सौ.देवकर व नगरसेवक श्री.पाटील यांनी या परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्नशील राहुत असे सांगितले.मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी यांनी या आयोजनात योगदान दिले. शेवटी मंडळाचे सचिव सागर पुकाळे यांनी आभार मानले.
या उपक्रमासाठी महानगर पालिका झोन नंबर पाच व सहाचे आरोग्य निरीक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
Post Views: 12