सोलापूर – येथील एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने शालेय शूटिंग बॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.
शनिवार पेठेतील शूटिंग बॉल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी बेगम कमरून्नीसा कारिगर गर्ल्स स्कूलला 2-0 ने असे हरविले. विजयी संघास क्रीडाशिक्षक नावेद मुंशी, इकबाल दलाल व अल्ताफ सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान, फौजिया शेख, फरजाना नदाफ, फरहात शेख, जाकीर शहापुरे, रियाज सय्यद व इद्रीस पेरमपल्ली आदीनी अभिनंदन केले .
विजेता संघ : अलमिनाज शेख, सायमा शेख , अदिबा शेख, मिजबा पटेल,सादिया डोंगरे, मंतशा बागवान, आलीना आलियास बिलगी , नसरीन हालयाल, मुसीरा फैयाज फजल, निकत बागवान, अयेमन शेख, जकीया सिद्दिकी.
—–





















