पंढरपूर – महार्षि वाल्मिकऋषी जयंती निमित्त श्री पुंडलिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवारी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
येथील पांडुरंग परिवाराचे नेते महेश परिचारक यांचे हस्ते व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव , ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मणभाऊ शिरसट, ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर अधटराव यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी मार्गदर्शन करताना महेश परिचारक यांनी महर्षि वाल्मिकींच्या जीवन कार्याचा गौरव करुन ट्रस्टच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांना बक्षिसे देवून प्रोत्साहन दिल्या बद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास ट्रस्टचे उपाध्यक्ष अनिल अभंगराव, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सचिव उमेश संगितराव, खजिनदार सतिश नेहतराव, विश्वस्त मारुती संगितराव, मुकूंद नेहतराव,सुरेश परचंडे, नितिन अधटराव, हणमंत अभंगराव, महादेव परचंडे, दत्तात्रय कांबळे, माजी नगरसेवक विक्रम शिरसट, प्रकाश अभंगराव, अशोक अधटराव, सागर तारापूरकर,सुरेश शिंदे, हरिभाऊ नेहतराव आदी व कोळी समाज बांधव व विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 18