सोलापूर – येथील जुळे सोलापूर ब्रह्म वधू वर सेवा मंडळातर्फे रविवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा डफरीन चौकातील आदर्श मंगल कार्यालय येथे दुपारी दोन वाजता होईल. या मेळाव्यासाठी पाच नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येईल.
मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी अध्यक्ष डी. डी. कुलकर्णी (९८९०८७४०३८) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच नाव नोंदणीसाठी राघवेंद्रचार्य आद्य गुरुजी (८८८८२१४७५४), तसेच बार्शी येथील घुमरे (९८२२७१६२११), माढ्याचे प्रमोद गोसावी (९४२०६४९७२७) आणि पंढरपूरसाठी हेमंत कुलकर्णी (९८६०८८२८५५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





















