सोलापूर : भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाचे पहिले गृहमंत्री व माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संचलित सोलापूर आपुलकी बेघर निवारा केंद्रात अभिवादन करण्यात आले.
यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.सोलापूर महानगरपालिकेच्या DAY-NULM च्या सीआरपी स्वाती सोनवणे, राष्ट्रमाता महिला बचत गटाच्या अध्यक्षा पुष्पा कांबळे, समूह संघटक वसीम शेख आणि निवारा केंद्राचे व्यवस्थापक अशोक वाघमारे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी महिला बचत गटाच्या सचिव लक्ष्मी बनसोडे, सारिका वाघमारे, शामल गोडसे, अनिता विभुते, निवारा केंद्रातील काळजीवाहक सुनीता म्हस्के, दिलशाद शेख यांच्यासह निवारा केंद्रातील सदस्य धर्मा कांबळे, बाळू रगडे, चांद शेख, रत्नाबाई कोंकत्ती, किसन कुंभार, श्रेयस नाडकर, नेहा बनसोडे, रागिनी कांची, मनोहर माने, मंतवा गडेद आदी उपस्थित होते.
—–
Post Views: 19