पंढरपूर – सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय, नातेपुते येथे २६ ते २७ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा (फ्री स्टाईल १२५ किलो वजनी गटात) शुभम हाकेने गोल्ड मेडल, (फ्री स्टाईल ७४ किलो वजनी गटात) पृथ्वीराज नरळे याने ब्राँझ मेडल तर (ग्रिको रोमन ७२किलो वजनी गटात) सार्थक वाघमोडे व (ग्रिको रोमन १३० किलो वजनी गटात) शिवशंकर आसबे या दोघांनी ब्राँझ मेडल मिळविल्याबद्दल खेळाडूंचे संथेचे अध्यक्ष तथा मा. आ.प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंद परिचारक, सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त प्रणव परिचारक व इतर संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संथेचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी खेळाडूना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 13