पिलीव – सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यात यंदाच्या दिवाळी सणावर प्रचंड मोठे दुषकाळाचे सावट अगदी स्पष्ट दिसत आहे.शेतकरी आर्थिक अडचणीत आहेच पण व्यावसायिक सुद्धा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. हिंदु धर्मातील सर्वात मोठा दिवाळी सण अगदी काही दिवसावर येऊन ठेपला आहे. पिलीव बाजारपेठेत सर्व व्यावसायिक आपल्या दुकानात म्हणजेच किराणा व्यापारी, कापड दुकानदार यासह सर्वच दुकाने माल भरुन व्यापाऱ्यांनी सज्ज केली आहेत. माञ अद्यापही बाजारपेठेत कुठेच गर्दी दिसुन येतच नाही .कारण दरवर्षी खरीप हंगाम चांगला झाल्यावर शेतकऱ्यांकडे त्यातुन पैसे आले की तो दिवाळी सणाला बाजारपेठेत खरेदीसाठी जातो यंदा माञ खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकरी प्रचंड मोठया आर्थिक अडचणीत आहे.पैसाच नाही तर खरेदी कशी करायची हा प्रश्न सध्या शेतकऱ्यासमोर आहे. पिलीव परीसरातील सर्वच खेडेगावातील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे .शेतीच्या उत्पन्नावर पिलीव बाजारपेठेतील खरेदी विक्री अवलंबून असते पण यंदा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. याचाच परिणाम पिलीव बाजारपेठेत दिवाळी चार दिवसावर आली तरीही खरेदीसाठी कुठेच गर्दी माञ दिसुन येत नाही पुर्ण पणे मंदीचे सावट अगदी स्पष्ट दिसुन येत आहे.यामुळे पिलीव बाजारपेठेतील व्यावसायिक सुद्धा यंदाच्या दुष्काळी सावटाचा सामना करीत आहेत. तयातच यंदा दरवर्षी पेक्षा जीवनावश्यक वस्तु साखर, खाद्यतेल, असो की इतर किराणा माल, अगदी गॅस याच्या दरात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाई व दुष्काळी परिस्थिती अश्या दुहेरी संकटात शेतकरी यंदाच्या दिवाळीत सापडला आहे. तशी पिलीव ही आसपासच्या दहा बारा खेडयासाठी मोठी बाजारपेठ आहे. सध्या पिलीव बाजारपेठ सजली आहे पण मंदीचे सावट अगदी स्पष्ट जाणवत आहे. दुष्काळी परिस्थितीत आपली यंदाच्या दिवाळीत आर्थिक उलाढाल कशी होईल अशी चिंता सध्या व्यावसायिकांना लागली आहे. चौकट _ शासन शेतकऱ्यांना पाच हजार रुपये एवढी मदत शेतकऱ्यांना देणार आहे पण प्रचंड महागाईच्या काळात पाच हजारात शेतकऱ्यांनी दिवाळी कशी करायची हा मोठा प्रश्न आहे . चौकट _ दरवर्षी दिवाळीच्या अगोदर आठ _ दहा दिवस आमच्याकडे खरेदीसाठी लोकांची गर्दी होत होती यंदा माञ अजुनही खरेदीसाठी म्हणावा तसा प्रतिसाद नाही .दुष्काळाच्या सावटामुळे यंदाच्या दिवाळीत आर्थिक उलाढाल किती होते याची चिंता आहे. सुरज खलीपे ,स्वप्नील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी…
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















