सोलापूर – सोलापूर मनपा शहर व जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन यांच्या वतीने ज्युनिअर मुले व मुली निवड चाचणी स्पर्धा रविवार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता साधना विद्यालय तावशी येथे होईल. या निवड चाचणी स्पर्धेतून निवडलेला सोलापूर जिल्ह्याचा संघ 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान रायगड येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेत सहभागी होईल. इच्छुकानी स्पर्धाप्रमुख दत्ता झांबरे (मो. 8788832358) अथवा मल्हारी भुसनर ( मो.7666994059 यांच्याशी संपर्क साधावा. खेळाडूंनी आधार कार्ड चे झेरॉक्स व आवश्यक सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित रहावे, असे सोलापूर जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे व सचिव राजकुमार मुंबरे याने कळवले आहे.
——



















