सोलापूर – सोलापूर शहर व जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या वतीने जिल्हा तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन वार रविवार 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता छत्रपती शिवाजी प्रशाला व नाईट कॉलेज येथे केले आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंचा जन्म 31-12-2013 पूर्वीचा असावा. या स्पर्धेतून निवडलेला संघ 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान माणगाव (जि. रायगड) येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होईल. इच्छुक खेळाडूंनी पवन भोसले अथवा (9637963777), अक्षय माने (8329070764) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश काटुळे यांनी केले आहे.




















