सोलापुरातील लोकप्रिय कवी प्रा. मुक्तेश्वर मुळे सरांच्या ‘ काळजाचंं झुंबर ‘ या काव्यसंग्रहाचे व त्यांच्याच ‘ मुक्त पाकळ्या’ या चारोळी संग्रहाचे प्रकाशन आमदार सुभाष देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या काव्यसंग्रहास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्री शिवाजीराव शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे.
भक्ती गीत, निसर्ग काव्य, सामाजिक काव्यरचना व प्रेम कविता अशा विविध काव्य रंगांनी सजलेल्या या दोन्ही साहित्यकृतींचे कौतुक मान्यवरांनी केले.
शिवस्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास डॉ .श्री.शिवाजीराव शिंदे, समाजभूषण डॉ.श्री. लक्ष्मणराव कार्ले , ज्येष्ठ पत्रकार श्री पद्माकर कुलकर्णी, ज्येष्ठ गझलकार श्री साबीर सोलापुरी, कवी श्री दत्तात्रेय इंगळे तसेच राज्याच्या अनेक भागातून आलेले साहित्यिक मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमांमध्ये ज्ञानदान प्रकाशन संस्थेच्या ‘साहित्यधन’ या विशेष दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे नियोजन मराठी साहित्य सेवा संस्था, सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले होते.
सारस्वतांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.
Post Views: 11