सोलापूर – शालेय शहर जलतरण स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजच्या खेळाडूंनी विविध प्रकारात यश मिळवले.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते, प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिव ज्योती काडादी, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्र.प्राचार्य डॉ .ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले.
कामगिरी : क्रिश गायकवाड (५० मी बॅकस्ट्रोक, द्वितीय), सिद्धेश्वर लादे (तृतीय), आभा मलजी (५० मी. ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय, बॅकस्ट्रोक प्रथम, डायव्हिंगमध्ये एक व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड आणि हाय बोर्डमध्ये तृतीय).
४ बाय १०० मी रिले प्रथम (सिद्धेश्वर लादे, क्रिश गायकवाड, दक्ष कोळी, समर्थ पाटील).























