पंढरपूर – महाराष्ट्रात दिवाळीची सुट्टी लागली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची परंपरा अत्यंत लोकप्रिय आहे. याच ऐतिहासिक संस्कृतीला जपत आणि शिवप्रेमाचा वसा पुढे चालवत, वरद बडवे व सृष्टी बडवे आणि त्यांच्या होतकरू भावंडांनी यंदा दुर्गराज ‘राजगड’—जो गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणून ओळखला जातो—याची अत्यंत भव्य आणि पर्यावरणपूरक प्रतिकृती साकारली आहे.
या किल्याची निर्मिती बद्दलची माहिती देताना सृष्टी आणि वरद बडवे या भावंडांनी सांगितले की, हा किल्ला तयार करताना शेतातील सुमारे २० ते २५ पोती काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे किल्ला बांधणीचा शुभारंभ करताना या भावंडांनी छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेल्या पवित्र किल्ल्यावरील माती आणि शेतातील माती आणून प्रथमतः भूमाता तसेच शिवप्रतिमेचे पूजन देखील आपले आजोबा दत्तामामा बडवे, मनोहर उत्पात व इतर शिवभक्तांच्या हस्ते करण्यात आले.
किल्ला तयार झाल्या नंतर ही भावंडे एवढ्यावरच थांबली नाहीत तर त्यांनी किल्ल्याला भेट देणाऱ्या शिवभक्तांना व मान्यवरांना या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास, गड तयार झाल्याचा काळ आणि महाराजांच्या वास्तव्या दरम्यान घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांची सविस्तर माहिती देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.
या संपूर्ण उपक्रमात कुटुंबातील सर्व तरुण मुलांनी एकत्र येऊन मोठी मेहनत घेतली आहे. या मध्ये प्रमुख शिलेदार असलेल्या वरद बडवे, सृष्टी बडवे, शौर्य बडवे, आर्यन बडवे, ध्रुव बडवे, श्रेयश बडवे, कृष्णा बडवे, स्वर्णिम बडवे आणि स्वरा बडवे आदींचा समावेश असून या उपक्रमासाठी या सर्वांना प्रणव खडके,अद्वैत बडवे, अथर्व अलंकार आणि भूमिका बेणारे यांनी मोलाची साथ दिली.
किल्ला बांधणीच्या उपक्रमात सर्वांत मोलाची सथा देणारे अर्थात किल्ला बांधणीसाठी जागा उपलब्ध करुन देणारे श्रीकांत उत्पात आणि सचिन शिंदे बाळासाहेब वेदपाठक आदी ज्येष्ठ मंडळींसह कायम प्रोत्साहन देणारे या प्रभागाचे नगरसेवक भागवत बडवे व बाबा महाजन बडवे, बालाजी महाजन बडवे, श्रीराम बडवे, विवेक परदेशी, हरिभाऊ गोमासे, मनोहर उत्पात, श्री.गंजेवार आदींचे देखील या सर्व भावडांनी आभार व्यक्त केले. ———————-
चौकट : ( पर्यावरणपूरक संदेश आणि रोपांचे वाटप )
हा संपूर्ण किल्ला पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने बनवला गेला आहे. शिवरायांच्या पदस्पस्पर्शाने पावन झालेली हीच माती पुढे जाऊन रोपांच्या माध्यमातून समाजाला वाटली जाते. किल्ला विसर्जित केल्यानंतर किंवा संपल्यानंतर त्या मातीत रोपे लावून ती रोपे मान्यवरांना व शिवभक्तांना भेट देण्याचा अनोखा उपक्रम ही भावंडे गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहेत, ज्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनमानसात रुजवला जात आहे.
Views: 11