सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रशासकीय स्तरावर महत्त्वाचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव माणिक गुरसळ हे रजेवर गेल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर अशोक काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन पदाचा कार्यभार त्यांनी नियमित कार्यभार म्हणून त्वरित स्वीकारावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुढील आदेश होईपर्यंत महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे कायम राहणार आहे.
या नियुक्तीमुळे अशोक काकडे यांच्याकडे आता दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदासह कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचीही जबाबदारी राहणार आहे.






















