वळसंग – दशरथ गुरव यांचा दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशनतर्फे सत्कार, मनोरमा मल्टीस्टेट बँकेच्या संचालकपदी निवड,दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशनतर्फे सत्कार व अभिनंदन
सोलापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. दशरथ गुरव यांची मनोरमा मल्टीस्टेट बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशनच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
श्री. दशरथ गुरव यांनी क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे क्रीडा शिक्षक संघटनेचा नावलौकिक वाढला असून, सहकार क्षेत्रातही त्यांना कार्य करण्याची संधी मिळाली आहे.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष गुरुपादप्पा तुप्पद, दक्षिण सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष वीरेश थळंगे, सचिव शिरीष गुरव, सहखजिनदार सुखदेव गुरव, खजिनदार संतोष भोसले, प्रसिद्धीप्रमुख गुरु अचलेरे, नागनाथ शिंदे, विठ्ठल कुंभार, सदस्य सुनील टेळे, रवींद्र डोंबळे, सिद्धाराम अंकुश, उमेश भोयटे, भीमाशंकर सगरे आदी पदाधिकारी व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी श्री. दशरथ गुरव यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Views: 10