अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या वाढदिवसानिमीत्त
देवस्थान कार्यालयात उदगीर येथील प्रशांत जाधव सर कुटूंबियांच्या वतीने नागफणी वृक्ष-रोपटे देवून नगरसेवक महेश मालक इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रशांत जाधव सर म्हणाले की, स्नेक प्लांट याला मराठीत नागफणी किंवा सापाची वनस्पती म्हणतात. ही घरात लावली जाणारी
एक लोकप्रिय आणि हवा शुद्ध करणारी वनस्पती आहे. वाढदिवसाला हारतुरे, केक यापेक्षा पर्यावरणाचे रक्षण हेच खरे गिफ्ट आहे हा संदेश देत प्रशांत जाधव सर यांनी महेश मालक इंगळे यांना वृक्ष रोपटं भेट दिला आहे. महेश मालक इंगळे हे स्वामींच्या सेवेसोबतच समाजसेवेत नेहमी पुढे असतात.त्यांच्या वाढदिवसाला त्यांना वृक्ष देणे म्हणजे त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देणे आहे. हे झाड वाढेल तशी त्यांची कीर्तीही वाढत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी जाधव कुटूंबातील प्रशांत शेषराव जाधव, क्रांती प्रशांत जाधव, रियांश प्रशांत जाधव, विपूल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
(चौकट – सर्व प्रथम प्रशांत जाधव सर यांचे आभार. वृक्षारोपण व संवर्धनासाठी आपण नेहमी पुढाकार घेऊ – श्री.महेश क. इंगळे – चेअरमन श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट)
फोटो ओळ – देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांचा सत्कार करताना प्रशांत जाधव सर व कुटूंबीय दिसत आहेत.
Views: 8