तालुक्यातील काळेगाव येथे महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी खरीप हंगामाच्या ऑनलाईन ई पिक पाहणीचे तलाठ्यांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले.
या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी उदमले तहसीलदार बाळासाहेब शिरसाट गट विकास अधिकारी सचिन खुडे हे अक्कलकोट तालुक्यातील काळेगाव येथे महसूल सप्ताह अंतर्गत कार्यक्रमास उपस्थित होते .यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हस्ते शिधापत्रिका ,दाखले ,मोफत सातबारा वाटप तसेच पंचायत समिती विभागाकडील ग्रामपंचायत निधीतून दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे चेक लाभार्थ्यांना वाटप केले.तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सदर कार्यक्रमा वेळी बाळ गोपाळांनी स्वागत गीत गाऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी बाळगोपाळांशी संवाद साधत हास्यविनोद करत खाऊचे वाटप केले .मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक वर्ग,विद्यार्थी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 122