पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले टीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने बालाजी सरोवर सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ अग्रणी उद्योजक राम रेड्डी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूरच्या पूर्व भागातील विडी कामगार यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या सामाजिक जाणीवेतून दशरथ गोप यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले कामगार कुटुंबातील मुलांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना उज्वल भविष्य घडवण्याची संधी मिळावी हा त्यांच्या कार्यामागील प्रमुख उद्देश आहे. संस्थेच्या सचिव पदाची जबाबदारी सांभाळताना दशरथ गोप यांनी संस्थेच्या विकासाला आणि शैक्षणिक कार्याच्या विस्ताराला प्राधान्य दिले. एकशे पंधरा वर्षे जुन्या शिक्षण संस्थेचे गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून प्रमुख सचिव पदाची धुरा यशस्वीरित्याने पाहून बलाढ्य उंचीच्या स्थावर मिळकती उभारून अतिप्रगत यंत्रसामग्रींसह परिपूर्ण वर्कशॉप, लॅबोरेटरी, डिजिटल क्लासरूम उभारले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली के.जी. ते पी.जी. व पी.एच.डी शिक्षण संकुले दिमाखदार पद्धतीने उभी आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह कामगार कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून संस्थेचे कार्य समाजाभिमुख बनले आहे अशा शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन टीव्ही महाराष्ट्र न्यूज वतीने त्यांना ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र, पुरस्काराने गौरविले. त्यांचा झालेला हा सन्मान पद्मशाली शिक्षण संस्थेच्या अभिमानाचा क्षण ठरला या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवी प्रतिष्ठा मिळाली असून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
दशरथ गोप यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी पालक आणि हितचिंतकांकडून अभिनंदन व्यक्त केले जात आहे .कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याने सोलापूरच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत टीव्ही महाराष्ट्र न्यूज च्या वतीने बालाजी सरोवर येथे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त पांडुरंग काका दिड्डी,नागनाथ गंजी,श्रीधर चिट्याल,विजयकुमार गुल्लापल्ली, मधुकर कट्टा, व्यंकटेश आकेन, दिनेश यन्नम, दत्तात्रय यन्नम, गणेश गुज्जा,श्रीनिवास गड्डम ,हरीश कोंडा उपस्थित होते.