सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा (मनोरमा) पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे ‘गझलदीप’ या विशेष गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात मराठी व हिंदी गझलांचा सुरेल प्रवास उलगडणार असून, संवादक शिल्पा देशपांडे आणि गझलगायक केतन गोडबोले यांचे सादरीकरण रसिकांना अनुभवता येणार आहे. तर गझल अभ्यासक प्रदीप निफाडकर हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी श्रीकांत मोरे म्हणाले की, मनोरमा परिवाराने आर्थिक सुबत्तेचा उपयोग केवळ बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता साहित्य, संस्कृती आणि समाजकारणासाठीही सातत्याने उपक्रम राबविले आहेत. वर्षभरात काव्यसंमेलन, पुरस्कार वितरण, गीत रामायण, आरोग्य शिबिरे तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. ‘गझलदीप’ हा कार्यक्रमही त्याच सांस्कृतिक परंपरेचा भाग असून, गझलप्रेमी आणि साहित्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन मोरे यांनी केले.
या पत्रकार परिषदेला मनोरमा मल्टीस्टेट चेअरमन शोभा मोरे, संचालिका डॉ. ऋचा पाटील, गजेंद्र साळुंखे , सुहास भोसले, चंद्रकांत खरटमल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी यांच्यासह बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 17