
वैराग : निसर्गाला सर्वाधिक प्राणवायू (ऑक्सिजन) आणि विस्तीर्ण शीतल सावली देणाऱ्या वटवृक्षाचे महत्त्व ओळखून, यंदा वटपौर्णिमेनिमित्त ‘एकता महिला मंच’च्या वतीने ‘एक गाव – एक वडाचे झाड’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथील महिला सदस्यांना दोन दिवसांपूर्वी वडाचे रोप देण्यात आले होते. केवळ झाड न लावता, त्याचे वर्षभर संपूर्ण जबाबदारीने संगोपन करण्याचा निर्धार महिलांनी केला. आज, २९ जून २०२६ रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधून गावातील महिलांनी या वटवृक्षाचे भक्तीभावाने पूजन केले आणि उत्साहात त्याचे रोपण केले.
“पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, केवळ पारंपरिक पूजेला मर्यादित न राहता प्रत्यक्ष वृक्षारोपण आणि संगोपनाची शपथ घेणाऱ्या शेळगावच्या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.”
या प्रसंगी ‘एकता महिला मंच’च्या पदाधिकारी गीतांजली जोशी, आशा विभुते, राजश्री बादगुडे, रंजना गवळी, राणी गवळी, अर्चना सपाटे यांच्यासह गावातील इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post Views: 6