सोलापूर – राज्यातील १११५५ ग्रंथालयात २०३३५ कर्मचारी कमी वेतनात काम करीत आहेत १८ डिसेंबर २०२३ पासून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आश्वासन देत आहेत पण शासन निर्णय देत नाहीत ग्रंथालय कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात ११ डिसेंबर २०२५ रोजी मोर्चा काढूनही काही निर्णय घेतले नाहीत.
जर ४०% अनुदान वाढ व इतर मागण्या बाबत शासनाने कॅबिनेट बैठकीत निर्णय न घेतल्यास पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान ते विधानभवन येथे मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले असल्याचे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले.
यावेळी सिद्राम बगले, धोंडिराम जेवूरकर, नरसिंह मिसालोलू, सिध्दाराम हालकुडे, विजयालक्ष्मी क्षिरसागर,रमा इपल्लपल्ली, आदी उपस्थित होते


























