पंढरपूर – मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत तिर्थक्षेत्र बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक नुकतीच संपन्न झालेली होती. या बैठकीचा तपशील देण्यासाठी काँरिडोर बाधित मंडळींची बैठक येथील नगरेश्वर मंदिर येथे मंगळवारी रात्री पार पडली. त्या मध्ये सर्वांनी संघटित राहून काँरिडोर विरोधात लोकशाही मार्गाने सरकारशी दोन हात करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती बचाव समितीचे प्रमुख अभयसिंह कुलकर्णी आणि रामकृष्ण महाराज वीर यांनी दिली.
या बैठकी संदर्भात माहिती देताना कुलकर्णी आणि वीर महाराज यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बचाव समितीने कोरिडोरचे वैय्यर्थ व भाविक हिताचे गोष्टी याबाबत तपशीलवार सूचना केल्या होत्या व त्यांनीही त्या आत्मीयतेने ऐकून घेऊन, तुमच्या सर्व सूचनांचा आदर केला जाईल असे आश्वासन दिले. तसेच आणखी सूचना काही असल्यास सादर करण्याचे आवाहन ही केले व त्याप्रमाणे सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांना निर्देश ही दिले.
बचाव समितीने, वारकरी पाईक संघाने स्थानिक अभियंत्यांनी तयार केलेला वारकरी भाविक हितैषी विकास आराखडा मुख्यमंत्री फडणवीस यांचे समोर सादर केला. ही पंढरपूरच्या समाजकारणातील ऐतिहासिक घटना होय. हा आराखडा व त्या अनुषंगाने केलेल्या अनेक सूचना यांचा शासकीय पातळीवर अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी. त्यात सरकार भाविक जनता यांची प्रतिनिधी असावे आणि त्यांनी या सर्व सूचनांचा अभ्यास करून अहवाल द्यावा आणि मगच कॉरिडॉरचा विषय घेण्यात यावा अशी मागणी ह.भ.प. वीर महाराजांनी केली होती त्या अभ्यास समितीच्या मागणीसाठी बचाव समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन उभे करण्यात येण्याचा निर्धार देखील याप्रसंगी सदर बैठकीमध्ये करण्यात आल्याची देखील माहिती कुलकर्णी आणि वीर यांनी दिली.
Post Views: 13