अक्कलकोट – अक्कलकोट शहरातील टिळक गल्ली येथे ब्राम्हण समाजाच्या वतीने सुरु झालेल्या श्री राघवेंद्र स्वामी आराधना महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाने अतिशय उत्साहात संपन्न झाली.
श्री राघवेंद्र स्वामी आराधना उत्सवानिमित्त पूर्वाराधना, मध्याराधना आणि उत्तराराधनेच्या पूर्वसंध्येला धान्यपूजा, गोपूजा व ध्वजारोहण करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी सकाळी पालखीतून श्रींच्या पादुकांची सवाद्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. या मिरवणुकीत समाजातील आबाल वृद्धांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महोत्सवाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पहाटे काकड आरती, पवमान अभिषेक, अष्टोत्तर वाचन, महानैवेद्य तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या सत्रात भजन व कीर्तनाचे कार्यक्रम झाले. रात्री पाळणा कार्यक्रमाने दिवसाची सांगता करण्यात आली. या उत्सवात विविध स्तरांतील आबालवृध्द भाविकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली.
तिसऱ्या दिवशी समाजाच्यावतीने श्रींच्या वृंदावनास लक्ष तुळशी अर्चना करण्यातआली. त्यानंतर महानैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमा सह भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्रम्हवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.
……..
……..
चौकट:- परशुराम भवनसाठी आर्थिक सहायतेचे आवाहन
श्री परशुराम भवनच्या उभारणीचे काम सुरु आहे. हा जगन्नाथरुपी रथास प्रत्येकाने हातभार लावावे. या उभारणीसाठी समस्त ब्रम्हवृंदांनी सढळ हाताने आर्थिक सहायता करण्याचे आवाहन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.