पंढरपूर – चंद्रभागेच्या आरतीमुळे केवळ धार्मिक विधीच होत नाही, तर समाजात भक्ती, श्रद्धा आणि एकतेची भावना वाढते. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सुरू केलेली ही आरतीची प्रथा वारकरण्याचे मन परिवर्तन करते. सामूहिक आरतीमुळे हजारो भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ” असे विचार ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी व्यक्त केेले.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या वतीने पवित्र चंद्रभागेची आरती या नित्य उपक्रमाचा एक भाग म्हणून आषाढ शुद्ध एकादशीच्या पूर्व संध्येला भक्त पुंडलिक घाटावर
ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांच्या हस्ते चंद्रभागेची आरती संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी सौ.उषा विश्वानाथ कराड, गोदावरीताई मुंडे, प्रा. स्वाती कराड चाटे , संजीवनी कराड आणि प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगावकर म्हणाले, ” या आरती मुळे भक्तांमध्ये सेवा भाव अधिक निर्माण होतो. प्रत्येकांची सेवा करने ही आम्हाला संतांनी दिलेली शिकवण आहे. त्यामुळे त्यांच्या पाऊलांवर चालणे हे सर्व वारकर्यांचे कर्तव्य आहे.
आज संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांचा संदेश पोहोचले आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा विनम्रता शिकविते.”
“चंद्रभागा आरती ही पंढरीची ओळख आहे. या परंपरेच्या माध्यमातून घराघरात भक्ती वाढते आणि माऊलींचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो.”
ह.भ.प. शालिग्राम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















