सोलापूर – सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले.
सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया च्या वतीने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात उपांत्य फेरीत त्यांनी यशोधरा प्रशालेस 1-0 ने हरवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात पानगलने सेंट जोसेफ स्कूलला 1- 0 असे नमविले.
संघांचे प्राचार्य डॉ.हारुन रशीद बागबान,फर्जना नदाफ,फौजिया खरेदी, रियाज सय्यद,ईदरीस पेरमपल्ली, जाकीर शहापुरे आदीनी अभिनंदन केले. संघास क्रीडा शिक्षक नावेद मुन्शी, इकबाल दलाल,अल्ताफ सिद्दिकी व कोच नेहाल दिवान, सैफुल्ला शेख आदींचे मार्गदर्शन लाभले.
—–
विजयी संघ : मुजम्मिल पटेल,अब्दुल्ला पटेल, फरहान पटेल, मुजफ्फर पटेल,असद कुरेशी, आबरार कुरेशी,उमेर शेख, सुफियान बागवान,माज मुन्शी, अरहान मनियार,अरशीन मणियार, रेहान खलिफा मुस्तफा बागवान, अजमत काझी,बासित कोतकुंडे, हुमेर शेख.
Post Views: 7