पंढरपूर – गेले काही दिवसात राज्यापुढच्या अनेक जटील समस्यांच्या सोडवणूकीपेक्षा सरकारला पंढरपूर कोरिडोर महत्वाचा वाटू लागला आहे. त्यामुळे की जणू सरकारला कोरिडोरज्वर निर्माण झालाय का ? असा सवाल येथील काँरिडोर विरोधी तिर्थक्षेत्र बचाव समितीचे प्रमुख अभयसिंह कुलकर्णी (इचगांवकर) यांनी उपस्थित केला आहे. कारण गुरुवारी काँरिडोर विधानपरिषदेचे मतदान होताच त्वरीत काँरिडोर मंजुरीबाबतचा शासन आदेश राज्य शासनाकडून निर्गमीत करण्यात आला. त्या नंतर कुलकर्णी यांनी राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांना उद्देशुन वरील प्रश्न उपस्थित केला.
या संदर्भात बोलताना कुलकर्णी यांनी सांगितले की, संपूर्ण अधिक महिन्यात पंढरपूरात वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, अनागोंदी दर्शन बारीतील भाविकांचे हाल,कोरिडोर मंजूर्या काळात चंद्रभागेत भाविकांचे लागोपाठ बळी यावर काही उपाय करण्यापेक्षा शासनाला बळजबरी कोरिडोर घोषणाच करावे वाटते हे दुर्दैवी आहे.
एकीकडे जागतिक युध्द संकटानंतर महाराष्ट्रावर कोरड्या दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. आणखी काही वर्षे कोरिडोर झाला नाही झाला काहीच फरक पडणार नाही. पण सरकारला पंढरपूर कोरिडोरचीच घाई झाली आहे.
पंढरपूर विषयक सरकार, “आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते,” या पध्दतीने वागत आहे. ज्या मंदिर समितीने यापूर्वी दिलेले (एमटीडीसी) भक्तनिवास प्रचंड जागा व इमारती विनावापर पडून ठेवल्यात. जी मंदिर समिती गोरक्षकांनी जीव धोक्यात घालून कसायांकडून कत्तलीस जाणारे गोवंशाचा सांभाळ करणेची खटपट करीत नाही, ज्या मंदिर समितीची शेकडो एकर जमीन स्वतः न कसता दुसर्यांना खंडाने दिली जाते, त्या मंदिर समितीला गोशाळा नावाखाली आणखी जागा देणे यातून फक्त सरकारचा आंधळेपणाच दिसून येत आहे आणी असाच आंधळेपणा कोरिडोर बाबतीत सरकार करित आहे.
त्यामुळे समृध्दी महामार्गावर जशी सहा तास गाडी चालवून प्रत्यक्ष अनुभव मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसे पंढरपूरात आपल्यासह प्रत्यक्ष आठ ते दहा तास पायी फिरुन मुख्यमंत्र्यांनी संपुर्ण शहराची पाहणी करावी व मगच कोरिडोरसाठीच्या सुयोग्य जागांचा निर्णय घ्यावा असे आवाहन हिंदुमहासभानेते व पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी ( इचगांवकर) यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
Post Views: 15