सोलापूर- सोलापूर जिल्हयातील अनुदानीत खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माध्यमिक शिक्षणविभागाकडून होणारे समायोजन प्रक्रिया शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक आणि अधिक्षक वेतन पथक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार सदर समायोजन प्रक्रियेस अखेर स्थगिती मिळणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे
जिल्हाअध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी कळविल्याचे कार्याध्याक्ष राजूदास पवार यांनी सांगीतले.
शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी शरद गोसावी शिक्षणसंचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडील दि.17 एप्रिल 2026 च्या आदेशाचे विचार न करता जिल्हयातील खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया राबविण्यासाठी आदेश पारित करून चुकीची यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत शिक्षकेतर कर्मचारी आणि महाराष्ट्रराज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघानी तीव्र नाराजी व्यक्त करून प्राथमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन चुकीच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक शिक्षण विभागास जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला होता.
सदर इशाऱ्या प्रमाणे जिल्हयातील बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक महासंघाचे पदाधिकारी यांनी सोमवारी दि.25 एप्रिलला2026 रोजी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि अधिक्षक वेतन पथक यांना समक्ष भेटून चुकीच्या पद्धतीने होणारे समायोजनास स्थगिती दिली नाही तर तीव्र आंदोलनाचे निवेदन देऊन प्राथमिकचे समायोजन शिक्षण संचालक प्राथमिक यांचे आदेश, न्यायालयीन प्रकरण, आचार संहिता, अनुदानीत खाजगी प्राथमिक शाळांना आरटीई कायदयापूर्वी मंजूरी मिळालेले एकाकी पद याचा साकल्याने विचार करून सदर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली असता शिक्षण उपसंचालक पूणेविभाग पुणे, माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी,अधिक्षक वेतन पथक, यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिले असून स्थगितीचे तात्काळ आदेश ही निर्गमित करणार असल्याचे सांगीतले. शिक्षक महासंघाचे मार्गदर्शक मा. शिक्षक आमदार ना. गो. गाणार, राज्य कार्याध्यक्षा उमाताई खापरे, आमदार सत्यजित तांबे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनानुसार संबंधित अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर प्रक्रिया तात्काळ रद्द करावे अशी प्रतिक्रिया जिल्हयातून आलेले बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष कल्लप्पा फुलारी, उपाध्यक्ष रमेश बेडगे,राज्य उपाध्यक्षा राजश्री तडकासे, कार्याध्यक्ष राजूदास पवार, सुरेश पाटील, सुनिल काळपगार, किरणबाबा गाटे, प्रशांत शिंगे आदि पदाधिकार्यासह चेतन बडगंची, शंकरलिंग मठपती, नौशाद शेख, चिदानंद पाटील, शिवकुमार जाधव, रमेश शिंदे, अजय रंगम, म्हांतय्या मठ, अविनाश पोफळे, सुरेखा केंगार, मुकुंद देशपांडे, नागेश डिंगो, अमोल पाटील, नानासाहेब दास, शोभा चव्हाण, गायकवाड ए. आर. उर्मिला जगदाळे, महादेव होमकर, जावेद काझी, नीलप्पा वाघोले, नीलकंठ पटणे, संजय दळवी, रुक्मिणी माशाळ, रियाज अत्तार, लोंढे, उपाध्ये, हुडे आदी शिक्षक आणि बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 5