Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासन सकारात्मक

तरुण भारतbyतरुण भारत
May 26, 2026
in solapur
0
अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांवर प्रशासन सकारात्मक
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, योगदान आधारित मासिक पेन्शन, ऑनलाइन कामकाजासाठी सुविधा, प्रोत्साहन भत्ता आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासन सकारात्मक असून यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी दिल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीचे नेते सूर्यमणी गायकवाड यांनी दिली.
             महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त सरदेशमुख यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत कृती समितीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. बैठकीस आयुक्त सरदेशमुख यांच्यासह क्षीरसागर, लोंढे, काकडे या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. कृती समितीच्यावतीने गायकवाड यांच्यासह शुभा शमीम, शाम काळे, दिलीप उटाणे, राजेश सिंग, दत्ता देशमुख, अतुल दिघे, शैलजा चौधरी, संगीता कांबळे, भगवान दवणे आदी उपस्थित होते. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचार्‍यांना ग्रॅच्युइटी लागू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. तसेच भविष्य निर्वाह निधी लागू करण्यासाठी शासन पातळीवर चर्चा सुरू असून, मासिक पेन्शनचा प्रस्ताव मंत्रीस्तरावर असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
           ऑनलाइन कामकाजातील अडचणींचा मुद्दा देखील बैठकीत गाजला. मोबाइलची अपुरी क्षमता, नेटवर्कचा अभाव आणि रिचार्ज खर्च लक्षात घेऊन सर्व अंगणवाड्यांना वायफाय सुविधा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मोबाइल न मिळालेल्या सेविकांना मोबाइल देण्यासह प्रोत्साहन भत्ता व रिचार्ज खर्चाबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. याशिवाय अनावश्यक रजिस्टर बंद करणे, आवश्यक रजिस्टर शासनाकडून उपलब्ध करून देणे, तपासण्यांतील त्रास कमी करणे, पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी अधिक वेळ उपलब्ध करून देणे, आहार दरवाढ, टीएचआर आहारात बदल, थकीत देयके नियमित करण्याबाबतही प्रशासनाने आश्वासक भूमिका घेतली.
          २०१८ पूर्वी मदतनीस म्हणून नियुक्त होऊन सेविका पदावर आलेल्या कर्मचार्‍यांना ६५ वर्षांपर्यंत सेवा सुरू ठेवण्याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत निघणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. दरम्यान, बैठकीत मांडण्यात आलेल्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने समाधान व्यक्त केले असून, उर्वरित प्रश्नांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
चौकट
केंद्र, राज्याचे मानधन एकत्रित वेळेत द्या
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना केंद्र शासनाकडून मिळणारे मानधन सध्या अनियमितपणे जमा होत असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा मानधन उशिरा मिळत असल्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण व दैनंदिन गरजा भागवताना अडचणी निर्माण होत असल्याचे कृती समितीने निदर्शनास आणून दिले. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारी दोन्ही मानधने दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत एकत्रितपणे नियमित जमा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
Post Views: 54
Previous Post

पत्नीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीस अटक करुन गुन्ह्यातील हत्यार केले जप्त 

Next Post

कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाडची  जिल्ह्यात सुवर्ण कामगिरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अंबाडची  जिल्ह्यात सुवर्ण कामगिरी

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907406

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697