कुर्डूवाडी – “विकसित भारत बिल्डथॉन २०२५” (Viksit Bharat Buildathon 2025) हा केंद्रीय शिक्षण मंत्रालय, अटल इनोव्हेशन मिशन (AIM), नीती आयोग आणि AICTE यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि देशव्यापी शैक्षणिक उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव (टे) संचलित, कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण देशातील शाळांमध्ये एकाच वेळी ‘लाईव्ह सिंक्रनाइझ बिल्डथॉन’ आयोजित करण्यात आला होता.
१३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रोटोटाइपचा २ ते ५ मिनिटांचा व्हिडिओ आणि संक्षिप्त माहिती अधिकृत पोर्टलवर अपलोड केली होती व त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये देशभरातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या शैक्षणिक उपक्रमामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातून 1175 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्या सर्व स्पर्धकांमधून कै.विठ्ठलरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 11वी च्या समृद्धी टीमच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. समृद्धी टीम अंतर्गत समृद्धी धनंजय टोणपे, सृष्टी संपत कदम, सायली किशोर खताळ, मोनाली बंडू बोराटे, व
मेघा संतोष कचरे या पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्रीम.पाटील एस एन ,श्री. तळे एम एस , श्री कांबळे बी एल ,श्री. गायकवाड एन एम ,श्री.तांबोळी एस एल ,श्री.हुलगे बी एस यांचेही मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष मा.आ.संजयमामा शिंदे तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य राजेंद्र ठोंबरे ,विद्यालयाचे प्राचार्य जवानसिंग रजपूत यशवंत प्रायमरी इंग्लिश स्कूल अंबाडचे प्राचार्य सोमनाथ होनमोटे,माध्यमिक विभाग प्रमुख पाटील एम एस,उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख घाडगे व्ही. एन. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Post Views: 5