सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील कृषी सहायक अमोल देवकर यांनी शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी कृषी सहायक अमोल देवकर यांच्यावर प्रशासकीय कारवाईची अटळ आहे . यामुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. कासेगाव येथील शेतकऱ्यांनी देवकर हे गावात येत नाहीत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाहीत आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत, अशी तक्रार केली होती. या तक्रारीबाबत विचारणा केली असता देवकर यांनी संबंधित शेतकऱ्यांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या घटनेची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कृषी सहायकाच्या वर्तनाचा निषेध म्हणून शुक्रवारी २९ मे रोजी कासेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘खरीप हंगाम विस्तार मोहीम’ कार्यक्रमावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला. संतापलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाला गावात कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे .
यामुळे शासनाच्या योजना पोहोचवण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. यापूर्वीही सरपंच यशपाल वाडकर यांनी कृषी सहाय्यक अमोल देवकर यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या होत्या. वरिष्ठांनी त्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन काम करण्याच्या सूचना देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. याउलट शुक्रवार २८ मे रोजी झालेल्या संभाषणात त्यांनी संपूर्ण गावकरी आणि शेतकरी बांधवांच्या भावना दुखावली आहे.
…..
चौकट
….
कारवाईची शिफारस
…
कृषी सहायक अनिल देवकर यांनी कर्तव्यात कसूर केली असून, त्यांची वागणूक बेजबाबदार आणि प्रशासकीय शिस्तीला न शोभणारी आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
अवधूत मुळे,
तालुका कृषी अधिकारी , दक्षिण सोलापूर
….
बेजबाबदार कृषी सहायकावर कारवाई व्हावे
…
कृषी सहायक देवकर यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी शेतकरी, सरपंच व गावकर्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे. यापूर्वीही देवकर यांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल वरीष्ठांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावे.
यशपाल वाडकर, सरपंच, कासेगाव
Post Views: 7