रागाने बघण्याच्या कारणावरून लोखंडी रॉड व फायटरने मारहाण – दोघे तरुण जखमी
सोलापूर – रागाने बघण्याच्या कारणावरून दोघा तरुणांना लोखंडी रॉड फायटर व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना लोधी गल्ली येथे आज बुधवारी सकाळी दहा वाजता घडली.
शुभम चरणसिंग मनसावाले (वय 26 वर्ष ) आणि रोहित चरण सिंग मनसावाले (वय 21 वर्ष , दोघे राहणार बेडरपुल ,सोलापूर ) अशी त्या जखमींची नावे असून ते दोघे आज सकाळी लोधी गल्ली येथील जुनी तालीम येथे असताना त्यांना शंकर बुरहानपुर ,विकी , विशाल व इतर चार ते पाच जणांनी मिळून मारहाण केली . यात दोघे मार लागून जखमी झाल्याने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात ते स्वतः सकाळी दाखल झाले .
घरगुती वादात पत्नीने खाल्ले ब्लेडचे लहान तुकडे
सोलापूर – घरगुती वादातून एका पत्नीने ब्लेडचे लहान लहान तुकडे करून ते खाल्ल्याची घटना 70 फूट भारतरत्न इंदिरानगर येथे मंगळवारी सायंकाळी घडली .
नंदिनी गजानन खरात (वय 19 वर्ष , रा.70 फूट रोड , इंदिरानगर , सोलापूर )असे त्या पत्नीचे नाव आहे .मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता घरामध्ये वाद झाल्याने त्या रागाच्या भरात नंदिनी हिने ब्लेडचे लहान तुकडे करून ते खाऊन टाकले .याचा त्रास होऊ लागल्याने तिला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात पती गजानन याने मध्यरात्री दाखल केले .
ब्लेडने शरीरावर वार करून घेऊन तरुण जखमी
सोलापूर – दारूच्या नशेत एका तरुणाने ब्लेडने हाता पायावर मारून घेऊन जखमी झाल्याची घटना विजापूर नाका येथील झोपडपट्टी क्रमांक दोन येथे आज बुधवारी दुपारी बारा वाजता घडली .
फिरोज मोहम्मद अन्वर शेख (वय 35 वर्ष , राहणार दोन नंबर झोपडपट्टी , सोलापूर) असे त्या जखमी तरुणाचे नाव असून तो आज दुपारी दारू पिऊन घरी आला असता त्याने नशेत अज्ञात कारणावरून स्वतःहून ब्लेडने आपल्या हात व पायावर मारून घेतले . यात जखमा झाल्याने त्याला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात पत्नीने दुपारी चार वाजता दाखल केले .
Post Views: 4