बार्शी – बार्शीत स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने सर्व स्वयंसेवक उपस्थित होते तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजित आव्हाड बार्शी तालुक्याचे संघचालक आनंदजी सोमानी आणि प्रमुख वक्ते म्हणून विद्याभारतीचे क्षेत्र उपाध्यक्ष शेषाद्री डांगे हे उपस्थित होते
डॉ. अजित आव्हाड यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शेषाद्री डांगे यांनी संघाची सामाजिक भूमिका आणि शंभर वर्षाचे कार्य याबद्दल नागरिक व स्वयंसेवकांना माहिती दिली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.