पंढरपूर – वेदशास्त्र परिषद राजमहेंद्रवरणं आंध्र प्रदेश येथील संस्थेच्या वतीने आयोजित घनांत परिक्षेत येथील अथर्व दत्तात्रय हरिदास याने घनांत परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले.
यावेळी किरण पाठक, सागर शर्मा, वैभव देशपांडे, गोविंद धर्माधिकारी हे घनपाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते.
संस्थेच्या पदाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भगवान श्रीकृष्णजन्माष्टमी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जयंती च्या निमित्ताने आयोजित सदर स्पर्धेत अथर्व याने प्रथम क्रमांक मिळविला. त्यास सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
वैदिक अभ्यासामध्ये घनांत परीक्षा ही सर्वात अवघड व प्रतिष्ठेची मानली जाते. अथर्व यांने लहान वयात ही पदवी प्राप्त केली असून यापूर्वी देखील विविध ठिकाणी वैदिक स्पर्धेत यश संपादन केले आहे. यावेळी ओझर येथील घनपाठी धनंजय जोशी उपस्थित होते.
Post Views: 8