पंढरपूर – युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश पाटील यांना प्रसार भारती नवी दिल्ली यांच्या पुणे आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार म्हणून “बी “ग्रेड मिळाली आहे. नुकतेच त्यांना हे पत्र पुणे आकाशवाणी कडून प्राप्त झाले. पाटील हे पं. दादासाहेब पाटील व पं.उमेश मोघे यांचे शिष्य आहेत.
भारतासह परदेशातही त्यांनी तबला वादनाचे अनेक कार्यक्रम सादर करुन रसिकांची दाद मिळवली आहे तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक कलाकारांना साथ संगत दिली आहे. जगभरातील अनेक देशातून त्यांच्या कडे विद्यार्थी तबला वादनाची तालीम घेत आहेत.
Post Views: 5