पंढरपूर – येथील लोटस इंग्लिश स्कूलमध्ये ‘इंग्लिश लर्निंग बडीप्रोग्रॅम’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन स्कूलच्या सभागृहात करण्यात आले आहे.दि. १९ एप्रिल पासून ते दि २१ जून २०२६ पर्यंत म्हणजे तब्बल १० आठवडे हा उपक्रमचालणार असून या उपक्रमात लोटसच्या विद्यार्थ्यांना अमेरिका व कॅनडा येथील विद्यार्थ्यांसोबत सहभागी होता येणार आहे. या उपक्रमाचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ.जयश्रीभोसले यांनी सांगितले की, ‘हा उपक्रम सोबस इनसाइट फोरम (एसआयएफ) या संस्थेच्यामाध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. सोबस ही संस्था समाजविकास आणि सक्षमीकरणासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था (एनजीओ) आहे. सोबस इनसाइट फोरमचे दिग्विजय चौधरी यांनी स्थापन केलेली ही संस्था पंढरपूर मधील विविध प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करते. इंग्लिश बडी या प्रोग्रामची सुरुवात अर्जुन मल्होत्रा यांनी केली आहे. जे भारतातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यापैकी एक असलेल्या एचसीएलचे माजी संस्थ्यापक आणि एसआयएफच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या जागतिकस्पर्धेच्या युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांना घरापासूनच भाषेचा सराव मिळावा यासाठी पालकांचे सहकार्य मिळवणे हा या कार्यक्रमाचामुख्य हेतू होता. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीशी ओळख होते आणि भविष्यातीलसंधीसाठी आत्मविश्वास वाढतो’.
या प्रसंगी शाळेच्या वतीने स्वेरीज्कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉ.हर्षवर्धन रोंगे यांनी सविस्तर माहिती दिली. हा शैक्षणिक उपक्रम हा १० आठवड्याचा आहे. यासाठी महाराष्ट्रातून २ शाळांची निवडकरण्यात आली आहे. त्यातील लोटस इंग्लिश स्कूल ही पहिली शाळा आहे. या उपक्रमासाठीअमेरिकेमधून २३ विद्यार्थी तर कॅनडामधून १७ विद्यार्थी लोटस इंग्लिश स्कूल मधीलविद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विद्यार्थी एकमेकांच्या सहाय्याने आणिपालकांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजीचे कौशल्य कसे वृद्धिंगत करू शकतील याचे यातून प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री भोसलेयांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहेयावर बहुमोल मार्गदर्शन केले. ‘इंग्लिश लर्निंग बडी प्रोग्राम’ हा केवळ अभ्यासाचाभाग नसून विद्यार्थ्यांना एकमेकांच्या सोबतीने हसत खेळत जागतिक भाषेवर प्रभुत्वमिळवून देणारा एक प्रभावी मार्ग आहे.
या कार्यक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमराव रोंगे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य डॉ.महेश्वर गायकवाड, पालक प्रतिनिधी सौ.मनिषा अरकिले, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिकाविभूती गवस यांनी केले.


























