मुळचा बोरगाव ता . माळशिरस तर सध्या वास्तव्य पुणे येथील उद्योजक गणेश साठे आपले नशीब अजमावणे साठी पुण्यास काही काम धाम मिळते का म्हणून गेला .
तिथे त्यांचे बंधू भाजपा अनु . जा . मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष भिमराव साठे यांच्या सहकार्याने रवतःचा लोखंडाचा व्यवसाय सुरू केला व आल्यावधीत त्यात तो चांगला स्थिरावला . उद्योग चांगला चालत होता परंतू वयाच्या २७ व्या वर्षी गणेशला मधुमेहाने गाठले . वयाच्या ४५ व्या वर्षी त्रास वाढल्याले डायलेसिस करावे लागले व यात किडन्या फेल झाल्या साठे कुटूंबावर हा मोठा आघात होता .
अशा प्रसंगी त्याची पत्नी मनीषा सावत्री होऊन पुढे आली आणि तिने किडनी पतीस देण्याच्या निर्धार केला .
शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती परंतू कोईंबतूर येथिल कोवई मेडिकलचे डॉ . विवेकजी पाठक यांनी कोशल्याने शस्त्रक्रिया पार पाडली . यामध्ये गणेशचा आजाराशी दीड वर्षाचा संघर्ष , आईचा आशीर्वाद , सावीत्रीच्या रूपाने आलेली पत्नी मनिषा व देवदूतहून आलेले डॉ . पाठक यांचे मुळे पुर्नजन्म मिळाला .
याकामी अर्थातच केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ , खा . मेधाताई कुलकर्णी , राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ , पुणे मनपा च्या विधी समिती सदस्या वर्षीताई भिमराव साठे , हनुमंत कुंभार , बोरगांवचे रामभाऊ मोहन साठे , राहूल मल्हारी मोकाशी यांचे सहकार्य लाभले .
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
. . . .दिव्यत्वाची जिथे प्रचिती तेथे कर माझे जुळती . . . .
कुटूंबावर आलेले संकट जेव्हा संयम , प्रार्थना व आप्ताच्या खंबीर साथीने परतवून लावले जाते तेव्हा ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती येते हेच माझा लहान भाऊ गणेश चाल्यावरील संकटावरून दिसून येते . म्हणूनच म्हणावेसे वाटते दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे माझे कर जुळती .
भिमराव साठे , अध्यक्ष अनु . जा . मोर्चा भाजपा पुणे शहर
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – फोटो :
गणेश साठे यांना जीवनदान देणारे डॉ . विवेक पाठक यांचा सत्कार करताना भिमराव साठे व परिवार .