
सोलापूर- सोलापूर जिल्हा बँक्स् असोसिएशन चे दि. २३ मे २०२६ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण
कार्यक्रम संपन्न झाले. असोसिएशन चे अध्यक्ष मा.डॉ.श्री अशोक सुरवसे यांनी आर.बी.आय.च्या रोजच्या नवनवीन नियम व धोरणांमुळे बँकांना दैनंदिन काम करणे सुलभ व्हावे यासाठी बँक कर्मचा-यांना प्रशिक्षण घेणे महत्वाचे आहे. प्रशिक्षणामुळे बँकांची प्रगती होण्यास मदत होईल असे प्रास्ताविकात सांगितले. मा.सीए श्री. राजगोपाल मिणियार, संचालक, महाराष्ट्र राज्य बँक्स् फेडरेशन, मुंबई यांनी “Audit Remarks and Compliance” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्या व्याख्यानात म्हणाले की, आर.बी.आय. व जागतिक वित्तीय मानकांनुसार KYC होणे आवश्यक आहे त्यामुळे खातेदारांच्या खात्यांची सुरक्षा वाढते व निधीचे संरक्षण होते व तुमच्या खात्यांमध्ये होणारा अनधिकृत प्रवेश रोखते. तसेच बँकेने आपले वैधानिक लेखापरीक्षण न केल्यास किंवा त्यात त्रुटी आढळल्यास बँकेला मोठा दंड लागू शकतो असेही त्यांनी सांगितले. मा. सीए. श्री. किसन माळी, चेअरमन, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, सांगोला अर्बन को. ऑप बँक लि, सांगोला “Credit Appraisal” या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्या व्याख्यानात म्हणाले की, कर्ज प्रकरणातील छाननी व्यवस्थित करावे, कर्जाचे वाटप व्यवस्थित होते व वसुली चांगल्या प्रकारे होते. कर्ज देताना काय काळजी घ्यावी, कर्ज छाननी, Balance Sheet, Documentation इ. वर अतिशय विश्लेषणात्मक माहिती सांगितली. कर्ज देताना ग्राहकाचे मुळ उत्पन्न बरोबर इतर उत्पन्नही विचारात घ्यावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले व तसेच सहकारातील कार्य करणा-या घटकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे असे सांगितले.
असोसिएशन चे उपाध्यक्ष मा.श्री. दिपक मुनोत, संचालक मा.श्री.दिनकर देशमुख यांनी वक्त्यांचे परिचय करुन दिले. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्री. अशोक सुरवसे, उपाध्यक्ष श्री. दिपक मुनोत, सर्व संचालक सौ. संगीता फाटे, श्री. दिनकर देशमुख, सह सोलापूर जिल्हयातील नागरी सहकारी बँकेचे मॅनेजर, सिनीअर ऑफिसर इ. उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार संचालिका सौ. संगिता फाटे यांनी मानले. सदर चर्चासत्राचे सुत्रसंचालन असोसिएशन चे सीईओ सौ. शुभांगी ढवळे यांनी केले.






















